Press "Enter" to skip to content

प्रामाणिकतेचे माहेरघर पर्यटनस्थळ माथेरान

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

अमूल्य किंमतीची वस्तू जरी एखाद्या ठिकाणी सापडली तरीसुद्धा त्या वस्तूवर आपला अधिकार नाही हक्क नाही याची जाणीव ठेवून जी वस्तू सापडली आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोच करणे ही किमया या लोभी दुनियेतील केवळ माथेरान मध्ये आजही फक्त स्थानिक मंडळींकडून पहावयास मिळत आहे.

माथेरानला दि. २७ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या वास्तव्यासाठी हॉर्सलँड हॉटेलला आलेले पर्यटक भूषण शर्मा या पर्यटकांचा आयफोन ८ + हा फोन दिनांक २८ डिसेंम्बर रोजी घोड्यावरून फेरफटका मारतांना लुईझा पॉइण्ट येथे साडेबाराच्या सुमारास हरवला होता.सदरचा मोबाईल हा माथेरान मधील रग्बी विभागात रहाणारे परमार्थिक वृत्तीचे बुवा सनगरे यांना सापडला होता.

हा मोबाईल हॉर्स लँड हॉटेल मधील एका पर्यटकांचा आहे हे समजल्यावर ताबडतोब बुवा सनगरे यांनी हॉर्सलँड हॉटेलचे व्यवस्थापक प्रसादभाई सावंत यांच्या उपस्थितीत भूषण शर्मा यांना तो आयफोन सनगरे यांनी त्याचदिवशी संध्याकाळी स्वतः येऊन हॉटेलमध्ये परत दिला.

तेव्हा त्या पर्यटकांना हर्षानंद होऊन
माथेरानच्या लाल मातीतील प्रामाणिकपणा आणि माणुसकी पर्यटकांना खूप भावली त्या पर्यटकांनी हॉर्सलँड हॉटेल व्यवस्थापन आणि बुवा सनगरे यांचे मनापासून आभार मानले.कदाचित हा किंमती मोबाईल परिसरातील कुणा अनोळखी व्यक्तीला अथवा व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्याना सापडला असता तर तो परत मिळाला नसता हेही तितकेच खरे आहे. या भूमीत पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांच्या अंगी आजही प्रामाणिकपणा अंगीकृत आहे याची प्रचिती सुध्दा त्या पर्यटकांना आली असून हरवलेला मोबाईल परत मिळणे ते सुद्धा या लोभी दुनियेत ही खरोखरच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल असे पर्यटक भूषण यांनी बोलून दाखविले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.