सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनीतील तुराडे येथील रोटरीयन गणेश वर्तंक यांचा परीसरात नावलौकिक आहे.त्यांचे जनसामान्यांतील कार्य आणि रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा यातील कार्यांची जनमानसात नेहमीच प्रशंसा होत असते.नुकताच रोटरीचा डिस्ट्रीक्ट अवार्डं सन २०१९-२०२० पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी रोटरीयन गणेश वर्तंक यांचा बेस्ट असिस्टंट गव्हर्नर म्हणून गौरव करण्यात आला.
सदर सन्मान त्यांना डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रवी धोत्रे,माजी गव्हर्नर डाॅ.महेश कोटबागी यांच्याहस्ते रोटरीयन गणेश वर्तंक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेली विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.रसायनीतील रोटरीयन गणेश वर्तंक यांना बेस्ट असिस्टंट गव्हर्नर म्हणून गौरव मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment