सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
वोडाफोन कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून सर्व बँकेच्या खात्याची माहिती घेवून त्यातून जवळपास 83,659/- रुपये ट्रान्सफर करून घेवून एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रमेश गोकर्ण (82) यांना अज्ञात आरोपींनी फोन करून तो वोडाफोन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी रमेश गोकर्ण यांचे सर्व बँकेचे कार्ड ब्लॉक झाले असल्याचे खोटे सांगून त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट नंबर तसेच इतर बँकांच्या अकाऊंट नंबरची माहिती काढून घेवून त्यानंतर त्याने पाठविलेला ओटीपी गोकर्ण यांच्याकडून जाणून घेवून त्या खात्यामधून गोकर्ण यांच्या संमतीशिवाय जवळपास 83,659/- रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.








Be First to Comment