Press "Enter" to skip to content

संजय सोनावणे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक संजय सोनावणे यांना युथ फोरम सोशिअल असोसिएशनच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

पनवेल परिसरात कोरोना काळामध्ये गोर – गरीब जनतेची मनापासून सेवा करणारे समाज सेवक संजय सोनावणे यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाची व सर्वसामान्य गरीब गरजूंची काळजी करणार्‍या व त्यांना जीवनाश्यक वस्तू तसेच मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप करणार्‍या समाजसेवक संजय सोनावणे यांना यूथ फोरम सोशिअल असोसिएशन यांच्यावतीने  गौरविण्यात आले.

कोरोना काळामध्ये निःस्वार्थी पणे समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले होते. यावेळी समाजसेवक नितीन जोशी. समाजसेवक यशवंत बिड्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.