Press "Enter" to skip to content

पेणमध्ये क्रुरतेने गाठला कळस

धक्कादायक : पेण हादरले ! अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत

पेण तालुक्यात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पेण तालुका हादरला आहे.

पेणकरांची आजची पहाट ही या वाईट घटनेने उजाडली. पेण तालुक्यातील मळेघर वाडी येथे ही घटना घडली आहे. एका अडिच वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पेण पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, पेण पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याला आधीही बलात्कारप्रकरणी अटक झाली होती. सध्या तो जामीनावर असून त्यानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.