सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (प्रतिनिधी )
नवी मुंबईतील नव्याने विकसीत होणारा उलवे नोड शहरातील आज जवळपास सर्वच सेक्टर हे रहिवाशायांनी भरले असुन प्रत्येकाकडे एक तरी दुचाकी किंवा चारचाकी वाहन
तसेच अनेकांकडे सीएनजी वाहन, रिक्षा सुद्धा आहेत. त्यासाठी आवश्यक डिझेल पेट्रोल पंप तसेच सिएनजी पंप नसल्याकारनाने ते इंधन भरण्यासाठी उलवेकरांना बेलापुर अथवा नेरुळ परिसरात जावे लागते, त्यामुळे सर्व वाहनचालकांची होणारी गैरसोय ही प्रशासनाने दुर करावी यासाठीच उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांनी उलवे मधे पेट्रोल पंप आणि सीएनजी पंप सुरु करण्याची मागणी केली आहे. आज उलवे शहरात सर्व प्रकारच्या खरेदीची दुकाने उपलब्ध असल्याने त्यांना उलवे सोडुन बाहेर खरेदीला जावेच लागत नाही. मात्र उलवे परिसरात इंधनाची सुविधा उपलब्ध नसल्याकारणामुळे सर्व वाहनधारकांची खुप मोठी गैरसोय होत आहे.
तसेच लॉकडॉऊन च्या अगोदर उरण बेलापूर मार्गावरील वाहतुक कोंडी चा अनुभव बऱ्याच नागरिकांना आलेलाच आहे. त्यामुळे सिडकोनी आरक्षित केलेल्या भुखंडावर लवकरात लवकर पेट्रोल पंप व सीएनजी पंप सुरु केल्यास पुढे उरण बेलापुर मार्गावरील वाहतुक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, तसेच वाहनधारकांना होणारा त्रास व वेळेचा अपव्यय नक्कीच दुर होईल.
त्याचप्रमाणे उलवे लगत असलेल्या अनेक गावांतील वाहनधारकांनाही ही इंधन सेवा फायदेशीर ठरेल असा विश्वास समाजसेवक किरण मढवी यांनी व्यक्त केला आहे.






Be First to Comment