Press "Enter" to skip to content

आवरे ग्रामपंचयतीतर्फे रामचंद्र म्हात्रे विद्यालयात कोरोना सुरक्षा साहित्य वाटप

सिटी बेल लाइव्ह । आवरे । प्रतिनिधी ।

आज संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे का ल परवा पर्यंत फक्त चीन पुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने संपूर्ण जग हे संक्रमित केलं आहे जागतिक व्यवहार हे संपूर्णपणे ठप्प झाले दैनंदिन जीवन हे पूर्ववत होण्यासाठी सुरक्षित व खबरदारी तसेच याचा फैलाव व संसर्गजन्य असल्यानं विद्यार्थ्यांना सुरक्षित उपाय म्हणून आवरे ग्रामपंचायत तर्फे 12सैनिटाइजर स्टैंड,12 सैनिटाइजर बॉटल , 560 मास्क तसेच सपूर्ण विद्यालय सैनिटाइजर करण्यासाठी 60 लीटर सैनिटाइजर है सपूर्ण साहित्य हे शाळेला दिले.

सदर अश्या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच निराबाई पाटिल , उपसरपंच समाधान म्हात्रे , ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष पाटिल ग्रामपंचायत सदस्या सौ गीतांजली गावंड , सौ सविता गावंड, श्री मोरेश्वर गावंड , श्री रविन्द्र गावंड हे मान्यवर उस्थितीत होते तसेच रामचंद्र म्हात्रे विद्यालयतील शिक्षकवृन्द तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.