Press "Enter" to skip to content

नागोठणे विभागातील उमेदवारांनी दाखल केले अर्ज

रोहा तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

रोहा तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका दिनांक १५ जानेवारी२०२१ रोजी होणार असून निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असल्यामुळे मंगळवार दि. २९ डिसेंबर रोजी रोहा तहसील कार्यालयासमोर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यानी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

दरम्यान नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे व ऐनघर आदी चार ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तहसिल कार्यालयात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याचे काम चालू असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता उमेदवारांनी आपले अर्ज कोणतीही घाई न करता बिनचूक दाखल करावे तसेच सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील असे यावेळी रोहा तहसीलदार श्रीमती कविता जाधव यांनी सांगितले

रोहा तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या नागोठणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार आपापले कार्यकर्ते मोठ्या संख्येने घेऊन आले होते. ऐनघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यावेळी अनेक तरुण व हौसे-नवशा उमदेवरांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्रत्येक उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरतांना आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले. दरम्यान ३१ डिसेंबर रोजी अर्ज छाननी तसेच ४ जानेवारी रोजी अर्ज मागे घेणे व उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असून ५ जानेवारी पासून निवडणुकीच्या धामधुमीस सुरवात होणार आहे. दरम्यान राज्यातील सत्तेत असलेल्या महाआघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत एकमेकांशी जमवून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र असे असले तरी स्थानिक पातळीवर कोण कशी आघाडी करतोय याची उत्सुकता सर्वांना लागून राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.