पनवेल शहर पोलिसांनी बलात्कारी नराधमाच्या 12 तासात आवळल्या मुसक्या
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
ख्रिसमस व न्यु इयर सणा निमित्त मुंबई भ्रमण करण्यास आलेल्या मुली सोबत बलात्कार करणार्या नराधमास पनवेल शहर पोलीसांनी 12 तासात जेरबंद केले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील कोळीवाडा स्मशानभुमीच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे, पनवेल येथील रिक्षाचालक सचिन नावाचे अनोळखी इसमाने फिर्यादी महिलेस दगडाने जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून तिचे संमतीशिवाय, इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केल्यावरुन गु.र.नं. 1 4 99 / 2020 भादवि कलम 376,506 ( 2 ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी.शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त रविद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करुन उपकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयातील पीडीत महीला ही जिल्हा जसपुर, राज्य छत्तीसगड येथुन नाताळ व न्यु इयर साजरा करण्यासाठी आली होती. प्रथम ती झारखंड वरुन दिल्ली येथे आली होती तेथे एक दिवस हॉटेल मध्ये राहुन पश्चिम एक्सप्रेस ने दिनांक 22/12/2020 रोजी बांद्रा रेल्वे स्टेशन येथे आली होती. सदर ठिकाणी तिला रेल्वे टीसी यांनी एकटी असल्याचे पाहून चाइल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिले व त्यांनी तिला सखी सेंटर मुलींचे होम मध्ये दाखल केले होते सदर ठिकाणाहुन तिची चौकशी करुन तिला सोडुन देण्यात आले होते.
दिनांक 26/12/2020 रोजी सदर पिडीत मुलगी ही सकाळी पनवेल रेल्वे स्टेशन येथे आली होती. सदर ठिकाणी शिवा नावाचे इसमाबरोबर तिची ओळख झाली होती व ती त्याचेसोबत राहीली होती. दिनांक 27/12/2020 रोजी सदर पिडीत मुलीने पनवेल रेल्वस्टेशन येथुन एका रिक्षाला हात दाखवुन गांधी गार्डन सोडण्यास सांगीतले असता त्याने सदर पिडीत महीलेस सदर ठिकाणी घेवुन न जाता वडघर नदीच्या काठी, स्मशानभुमीच्या बाजूला झाडीमध्ये घेवून जावुन सदर ठिकाणी पडलेला दगड तिचेवर उगारुन तिला जीवे मारण्याचा धाक दाखवून तिचेवर जबरदस्तीने बलात्कार केला.
याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि ( गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयात गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रीक तपास चालु केला होता. सदरची पिडीत मुलगी ही रेल्वस्टेशन परीसरातुन रिक्षात बसली असल्याने तेथील सर्व रिक्षा चालक, झोपडपट्टी, रहीवाशी सोसायटया व व्यवसायीक आस्थापना यांचेकडे सदर आरोपी बाबत चौकशी सुरु केली होती. सदर चौकशी सुरु असता आरोपीतचे ताब्यात असलेले संशयित रिक्षाबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली होती.
त्यावरुन पुढे तपास सुरु करुन सदर आरोपी सचिन लालताप्रसाद शर्मा (26) बारवाई गाव, पोस्टे पोयंजे, ता . पनवेल जि.रायगड येथुन रिक्षासह ताब्यात घेवुन अटक केले आहे. सदर गुन्हयात आरोपीबाबत कोणताही मागमुस नसतांना केवळ फिल्ड वर्क ’ ’ द्वारे माहीती प्राप्त करुन 12 तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या तपास कामात तपास अधिकारी सपोनि मोनाली चौधरी, पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि शिंदे , पोउपनि सुनिल तारमळे , पोहवा / विजय आयरे , पोहवा / वाघमारे , पोशि / राजु खेडकर , पोना / विनोद पाटील पोशि / सुनिल गर्दनमारे , पोशि / यादवराव घुले पोना / पंकज पवार , पोना / परेश म्हात्रे , पोना / गणेश चौधरी व पोशि साळुखे यांनी केली आहे.








Be First to Comment