Press "Enter" to skip to content

दांडफाटा येथे विविध विकासकामांचे उदघाटन

रिस पंचायत समिती गणातील नढाल,दांडफाटा,कांबे,चांभार्लीं हायमास्ट दिव्यांनी उजळला

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रिस पंचायत समिती गणाचा विकास व्हावा यासाठी माजी सरपंच कृष्णा पारंगे हे प्रयत्नशील असून या परीसरात नागरिकांसमोर विकासकामांबाबत कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी धडपडत असतात.मुंबई -पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटा हा महत्त्वाचा थांबा आहे.येथे निवारा शेडचा अभाव असल्याने नागरिकांना तसेच पोलिसांना भर उन्हा पावसात उभे राहावे लागत होते.ही समस्या माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी आपल्या सौभाग्यवती पंचायत समिती माजी सभापती कांचन पारंगे यांना सांगून पाठपुरावा केला.अखेर प्रयत्नांना यश आल्याने माजी सभापती कांचन पारंगे यांनी पंचायत समिती सेसमधून दांडफाटा येथे निवारा शेड,हायमास्ट दिवे,सिसीटीव्ही कॅमेरा, सार्वजनिक शौचालय व पाणपोई तसेच नढाल,कांबे,चांभार्ली येथे हायमास्ट दिवे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी दांडफाटा येथे लावलेल्या हायमास्ट दिव्यांचे व सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे उदघाटन रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच दांडफाटा येथील निवारा शेड, सार्वजनिक शौचालय, पाणपोई यांचे उदघाटन खालापूर तालुका पंचायत समिती सभापती वृशाली पाटील, सरपंच ताई पवार,माजी सरपंच अशोक मुंढे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेली रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे यांच्या कार्याचे कौतुक केले.

कांबे येथील हायमास्ट दिव्यांचे उदघाटन चांभार्ली ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिप पाटील,माजी पंचायत समिती सदस्या दिप्ती पाटील, उर्मिला डवले,दिपाली म्हात्रे, नंदकुमार कुरंगले यांच्याहस्ते संपन्न झाले.चांभार्ली येथील हायमास्टचे उदघाटन काॅग्रेसचे जेष्ठ नेते अशोक मुंढे,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांच्या हस्ते संपन्न झाले.नढाल येथील हायमास्टचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेली समीर दलवी,प्रविण नलावडे, सचिन चालके, दिपक गरुडे,नरेश भोईर आदी उपस्थित होते.

दरम्यान माजी सरपंच कृष्णा पारंगे हे वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे फक्त सात महिन्यांच्या सरपंच कालात ग्रामपंचायत हद्दीत विकासगंगा आणून सरपंच कसा असावा ,याची प्रचिती करुन दिली.त्यांनी सात महिन्यांच्या सरपंचकालात केलेल्या विकासकामांची आजही सर्वंत्र चर्चां होताना दिसत आहे.दांडफाटा हे ठिकाण मुंबई-पुणे जुना महामार्ग व रसायनी परीसराचा मुख्य ठिकाण असल्याने दांडफाटा येथे सिसीटीव्ही कॅमेरे व हायमास्ट दिवे लावून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे काम केले आहे.दांडफाटा येथे घडणाऱ्या घटना सिसीटीव्हीत कैद होणार असून नागरिकांना हायमास्ट दिव्यांमुले रात्रीचा प्रवास करणे सोयिस्कर होणार आहे.तसेच पोलिसांसाठी, नागरिकांसाठी निवारा शेड, सार्वजनिक शौचालय व पाणपोईची व्यवस्था केल्याने नागरिकांतून माजी सरपंच कृष्णा पारंगे तसेच त्यांच्या सौभाग्यवती माजी सभापती कांचन पारंगे यांना नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून पंचायत समिती वृशाली ज्ञानेश्वर पाटील, माजी सभापती कांचन कृष्णा पारंगे, सरपंच ताई पुंडलिक पवार,काॅग्रेसचे जेष्ठ नेते अशोक मुंढे, उपसरपंच राकेश खारकर, उपसरपंच प्रतिप पाटील,माजी सरपंच लक्ष्मण पारंगे, ग्रामपंचायत सदस्या श्वेता कांबळे, माधुरी जांभले,दिपाली म्हात्रे,अजय म्हस्कर,श्याम म्हस्कर,सागर सुखदरे, पांडुरंग पायंडे, भगवान जांभले, देविदास म्हात्रे, प्रकाश पाटील, अशोक पारंगे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.