सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत मधील साई गणेश हॉलचे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघाचे पहीले आमदार नरहरी तथा बाबासाहेब ठोसर यांचे पणतू तसेच उल्हासनगर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका वैजयंती मधुसुदन ठोसर यांचे नातू हितेश गणेश ठोसर यांच्या साई गणेश हॉलचे उद्घाटन कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेविका मधुरा चंदन, नगरसेवक राहुल डाळींबकर,माजी नगरसेवक संतोष पाटील, महेंद्र चंदन, वैजयंती ठोसर, गणेश ठोसर,जान्हवी ठोसर, श्वेता ठोसर, हितेश ठोसर, सनावी ठोसर, प्रसादबुवा पाटील,सुचिता वांजळे,दिलीप आंबवणे, राजन भोळे, राजू पोतदार, सुशिल आंबवणे आदी उपस्थित होते.
कर्जत पूर्व बाजूला रेल्वे स्थानकापासून दोन मिनिटांवर तहसिल कचेरी खालील बाबासाहेब ठोसर मार्गावरील मधुतारा बंगल्याच्या पहील्या मजल्यावर असलेल्या या हॉलची 80 ते 100 व्यक्ती बसण्याची क्षमता असून वाढदिवस, साखरपुडा, मुंज आदी कार्यक्रमांकरीता हा हॉल निश्चितच उपयुक्त ठरेल.








Be First to Comment