नियम विरानी देशात 34 व्या स्थानी
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.यात चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १००% लागला असून कु. नियम वीराणी याने ९३.२० टक्के गुण मिळवून देशात ३४ वा क्रमांक मिळवत वरचढ ठरला आहे.
तर कु.भार्गव शहा याने ९१. २ % तर कु. वृंद कसोडारियायाने ९०. ६% मिळवून यंदाच्या दहावीच्या परीक्षेत बाजी मारली .याशिवाय कु. राज पाटील. कु. नीर कसोडारिया ,कु. धृमील पटेल, कु,कुश गोवडा ,कु स्मित चौंडीये ,कु कुणाल काळे ,कु कीथ कंदूर ,कु जनय संगानी ,कु प्रांशू पटेल ,कु ओजस्व निमारे ,कु ऋषील शहा, कु रमण शर्मा यांनी विविध विषयात ९० पेक्षा अधिक गुण विविध विषयात मिळवले आहेत . विशेष म्हणजे यावर्षीची ही शाळेची पहिली तुकडी होती आणि त्यामुळे सर्वांचे लक्ष्य या निकालाकडे होते. परंतु विद्यार्ध्याच्या या यशामुळे शाळा व्यवस्थापन शिक्षक पालक यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.






Be First to Comment