सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
दिशा केंद्र संचालित रायगड चाईल्ड लाईनच्यावतीने कर्जत मध्ये वाढत्या बाल मजुर प्रश्नाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्जत पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिशा केंद्र संचालित रायगड चाईल्ड लाईन टीम यांनी कर्जत तालुक्यात वाढणाऱ्या बालमजूर प्रश्नाबाबत आवश्यक पाऊले उचलण्या करिता कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडिकर व पोलीस निरीक्षक अरुण भोर कर्जत यांना निवेदन देण्यात आले.
चार दिवसांपूर्वी रायगड चाईल्ड लाईन च्या प्रसंगावधानाने कर्जत मध्ये भीक मागणाऱ्या मुलींना व त्यांचा कुटुंबाला समुपदेशन करून मुलींचे भविष्य सुधारण्या साठी कार्य करण्यात आले होते. या प्रसंगाचा विचार करता रायगड चाईल्ड लाईन यांनी आऊट रीच दरम्यान कर्जत बाजारपेठेत बाल मजुर असल्याचे आढळले. दुकान मालकांना कमी पगारात बाल मजुर मिळत असल्याने कर्जत बाजारपेठेत बाल मजुरी चे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे ही एक चिंताजनक बाब आहे.
या समस्येची दखल घेता रायगड चाईल्ड लाईन यांनी कर्जत परिसरात व बाजारपेठमध्ये जनजागृती कार्यक्रम व सर्व्हे घेण्याचे योजिले आहे या सर्व्हे मध्ये कर्जत पोलिसांचा समावेश असावा असे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना देण्यात आले.
यावेळी रायगड चाईल्ड लाईन डायरेक्ट उज्जैन शिरसाठे, चाईल्ड लाईन समन्वयक वैष्णवी दभडे, चाईल्ड लाईन टीम मेंबर जगदीश दगडे,रेखा भालेराव, अनिता जाधव, वैजयंती श्रीखंडे व सोबतीन कुटुंब सल्ला सहाय्य केंद्र समुपदेशिका माधुरी कराळे उपस्थित होत्या.








Be First to Comment