सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील भिवपुरी आणि जिते गावातील ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

पोसरी येथील आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भिवपुरी व जितें ग्रामपंचायत हद्दीतील संतोष घाडगे, विजय लोहारे, दशरथ मुकणे, सुनील मोरमारे, दिनेश कराळे, संजय मोरमारे, सविता नवले, हर्षद नवले, गुरुनाथ गारे, शेखर नवले, मनोज ढाकवळ, सुयोग तापकीर, शिवाजी भोईर, अशोक भोईर, बाबु भोईर, काळूराम मिरकुटे, नरेश भोईर, सुरेश भोईर आदी चा समावेश आहे.








Be First to Comment