जिल्हा परीषद शिक्षकांची चटोपाध्याय-वरीष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात शिक्षक सेनेला यश
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
रायगड जिल्हा परीषद शिक्षकांचे वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मागील अनेक महिने प्रलंबित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या प्रयत्नांमुळे तसेच माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे पोलादपूर, जि.प. सदस्य रविंद्र देशमुख पाली, जि.प.सदस्य विजय भोईर उरण यांनी केलेल्या सततच्या पाठपूराव्यामुळे शिक्षक/पदविधर शिक्षक/मुख्याध्यापक यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
ह्यासाठी शिक्षक सेना कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, शिक्षक सेना रायगड अध्यक्ष-रोशन तांडेल, सरचिटणीस-हितेंद्र म्हात्रे यांनी वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हास्तरावर प्रयत्न केले.
या यशाबद्दल शिक्षक सेनेच्या टीमचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे
येत्या काळात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तालुका, जिल्हा तसेच राज्य स्तरावर शिक्षक सेनेकडून आवाज उठविण्यात येईल. असे शिक्षक सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







Be First to Comment