Press "Enter" to skip to content

रसायनशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधनासाठी पुरस्कार

डॉ.अनिरुद्ध पाटील ‘यंग असोसिएट महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स पुरस्काराने’ सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । पेण । पंकजकुमार पाटील ।

यावर्षी देण्यात आलेल्या ‘यंग असोसिएट महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स पुरस्काराने ‘ रायगड जिल्हा व पेण तालुक्यातील उच्चशिक्षित तसेच तरुणांचे रोल मॉडेल डॉ. अनिरुद्ध पाटील यांचा सन्मान करण्यात आला आहे . रसायनशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे .

रसायनशास्त्र विषयातील या पुरस्कारासाठी या वर्षी महाराष्ट्रभरातून ८ तरुण संशोधकांची निवड करण्यात आली होती. सध्या स्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने ऑनलाईन माध्यमातून संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये डॉ. पाटील यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा प्रोफेसर यादव (अध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सायन्सेस) ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. डॉ. अनिरुद्ध पाटील ह्यांनी ह्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबियांना व महर्षी दयानंद महाविद्यालयाला दिले आहे.या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.