तबेला मालकाविरोधात आदिवासी कुटूंब खालापूर पोलीस ठाण्यात
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
तबेल्यातील शेणमूञ नाल्यातून पाझरत विहिरित जात असून दूषित पाणी प्यायची वेळ आलेल्या विणेगाव आदिवासीवाडीतील महिलानी थेट खालापूर पोलीस ठाणे गाठत तबेला मालकावर कारवाईसाठी पोलीस निरिक्षक अनिल विभुतेना गा-हाणे घातले आहे.

कलोते ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विणेगाव येथील दांडवाडी आणि कातळाची वाडी या दोन आदिवासीवाडी करिता पिण्याचे पाणी योजना विहिरिवर राबविण्यात आली आहे.दोन वाडीतील जवळपास नव्वद कुटूंब या विहिरितील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी करतात.विहिरिपासून काहि अंतरावर म्हशीचा तबेला असून या तबेल्यातील शेणखळीचे पाणी वाहत ओढ्यात जात आहे.ओढ्यातील पाणी पाझर पद्धतीने विहिरित जात असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे.गेले कित्येक दिवस हा प्रकार सुरू आहे.ग्रामपंचायतीने तबेला मालकाला नोटीस देवून सुद्धा काहिच फरक पडला नसून शेणमूञ ओढ्यात सोडणे सुरूच आहे.
सध्या पाण्याला अतिशय घाण वास येत असल्याने तोंडात पाणी घेता येत नसून दोन दिवस विकतच टँकरच पाणी आणण्याची वेळ गरिब आदिवासी कुटूंबावर आली आहे.आदिवासी बांधव या प्रकाराने संतप्त असून विणेगावचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाडिक यांच्या मदतीने शनिवारी कातळवाडीतील महिला खालापूर पोलीस ठाण्यात धडकल्या. लेखी तक्रार अर्ज देत तबेला मालकावर कारवाईची मागणी महिलानी निवेदनाव्दारे केली आहे.

आमची पोरबाळ दूषित पाणी पिऊन आजारि पडली आहेत.तबेलावर कारवाई न झाल्यास ऊग्र आंदोलन करावे लागेल
सुवर्णा वाघमारे -कातळवाडी विणेगाव
ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तबेला मालकाची कोणाचे लागेबांधे आहेत याचा जाब पंचायत समितीत सोमवारी विचारू.गरिबाना विकतच पाणी घ्यावे लागत आहे.
दिनेश महाडिक -तंटामुक्ती अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते.विणेगाव








Be First to Comment