जिल्हाधिकाऱ्यांच्या अवाहनाला व्यापाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
संपूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारीचे संकट तर काही मरी म्हणून मृत्यूचे तांडव त्याच प्रमाणे देशात व राज्यात त्याचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी मागील तीन चार महिन्यांपासून विविध स्तरावर लॉकडाऊन टाळेबंदी केली जात आहे देशात त्याचा हा हा कार माजत मुबंईसह सर्वत्र राज्यात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहचला २२ मार्च पासून लॉकडाऊनवर लॉक डाऊन केले तरी देखील त्याचा पादुर्भाव ग्रामीण भागात पोहचला गेली तीन महिने ग्रामीण भागातील नागरिकाने देखील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य केले हात मजुरी करणार्यांनी देखील या भीतीपाई हलाक्याचे दिवस काढले तरी देखील त्याचा वाढता संसर्गाचा ताप कमी झाला नाही आता त्याला रोखण्यासाठी दहा दिवसासाठी जिल्हा बंदी करण्यात आली त्याला कोलाड खांब नाका कडकडीत बंद करत व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आहेत,
रायगड जिल्ह्यासह तालुका स्तरावर कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांनी 15 जुलै रात्री बारा वाजल्यापासून ते २६जुलै या कालावधीत संपूर्ण रायगड दहा दिवस लॉकडाऊन पुकारला असून त्याला सर्वच स्तरांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे,
अनेक उपाय योजना करून कोरोनाचा वाढता पादुर्भाव,
रोहा तालुक्यात गेल्या महिन्याभरात कोरोना बाधितांची संख्या तीनशेहून अधिक गेली त्यात पाच जणांचा मृत्यू झाला हे दुर्दैव आहे त्यातच एक महिन्याच्या कालावधीत तब्बल रोहा बाजारपेठ ही वीस दिवसांहून अधिक दिवस लॉक आऊट म्हणून बंदच होती त्यात त्या धर्तीवर कोलाड खांब हे देखील अधून मधून बंद ठेवण्यात येत होते परंतु कोरोना काही कमी झाला
नाही त्याउलट त्याची दुपट्टीने संख्या वाढत गेली आणि संपूर्ण रोहेकरांसाठी कोरोनाच्या संकटाची भर अधिक वाढत जाऊन मोठी धास्ती निर्माण झाली त्याच बरोबर संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण नऊ हजाराच्या आसपास पोहचली असून २३०जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे दिवसेंदिवस वाढती संख्या ही रायगडात धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या दहा दिवसांच्या लॉक डाऊन टाळेबंदीत प्रशासकीय यंत्रणेला कोरोनाला हद्दपार करण्यात कितपत यश मिळेल याकडेच लक्ष वेधले जात आहे.






Be First to Comment