Press "Enter" to skip to content

रोह्यात नाताळाचा सण उत्साहात साजरा

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

सेक्रेड हार्ट चर्च रोहा येथे ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमादरम्यान सर्व लोकांनी महामारीमूळे सरकारने दिलेल्या नियमावलीचे व सोशल डिस्टनसिंगचे
पालन केले.

यानिमित्ताने सर्व बांधवांकडून चर्चची उत्क्रुष्ठरित्या सजावट करण्यात आली होती तर युवक व युवती वर्गानी येशू ख्रिस्तांच्या जन्माचा भव्यदिव्य असा देखावा तयार करण्यात आला होता. या देखाव्याच्या माध्यमातून सर्व बांधवांनी एकता,समानता,बंधूभाव व सर्वधर्म सहिष्णूतेचा संदेश देण्यात आला होता.या देखाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून महामारी व निसर्ग वादळ यावर कशी मात केली हे दाखवण्यात आले होते.

याचबरोबर या संकटकाळात सॅक्रेड हार्ट चर्च,जीवनधारा व स्नेहवर्धिनी या संस्थांनी लोकांपर्यंत कशी मदत पोहोचवली हे दाखवण्यात आले होते.प्रार्थनेच्या दरम्यान धर्मगुरू फादर डायगो फर्नांडिस आणि फादर फ्रान्सिस्को रोड्रिग्ज यांनी सर्व बांधवांना एकीचा, प्रेमाचा व आशेचा संदेश दिला.
गतवर्षाप्रमाणे याही वर्षी नाताळाचा सण उत्साहात साजरा करताना सामाजिक स्वास्थाला कुठेही धोका पोहचू नये या अनुषंगाने शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला.

रोहे शहरासह ग्रामीण भागातील विविध धर्मीय समाजबांधवांनी या उत्सव काळात आपला सहभाग दर्शवून उत्सवाची शोभा वाढविली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.