Press "Enter" to skip to content

महिलांची मोफत थाॅयराईड तपासणी शिबिर संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । मनोज कळमकर – राकेश खराडे ।

पोलीस ठाणे खालापूर आणि पूजा पॅथोलोजी यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर येथे महिलांसाठी मोफत थाॅयराईड तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या संकल्पनेतून स्वस्थ नारी सशक्त परिवार उद्देशाने तपासणी शिबिर घेण्यात आले.

शिबिराचे उदघाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या हेमलता चिंबुळकर,राजेश पारठे,राकेश गव्हाणकर,पोलीस कर्मचारी अर्पिता खैर,प्रतिक्षा म्हाञे उपस्थित होत्या.

खालापूरातील शंभर महिलानी यावेळी मोफत तपासणी करून घेतली.खालापूर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचा-यानी  देखील शिबिरात सहभाग घेतला.पूजा पॅथोलजीचे राजेंद्र जगताप,अजय दिघे,आकांक्षा पाटील,पूर्णिमा जगताप,अनुष्का जगताप,अक्षय निभये,निलेश भोसले यानी शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.