Press "Enter" to skip to content

रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची सभा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रोहा । याकूब सय्यद ।

सध्‍या संपूर्ण रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असताना त्या अनुषंगाने रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात ही सभा रोहा तालुका अध्यक्ष निजाम भाई सय्यद यांनी आयोजित केली होती.

या सभेच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर भाई सकपाल हे होते. या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बशीर भुरे उपस्थित होते.

त्यांच्याबरोबर विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष मन्सूर भाई धनसे तसेच तळा तालुका अध्यक्षा सौ. अकबरी गोटेकर, रिजवाना गोटेकर, सना रहाटविलकर, सिमरन रहाटविलकर, फिजा कारदोकर, रोहा पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी, अल्पसंख्याक रोहा तालुकाध्यक्ष याकूब सय्यद, नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, सुनील देशमुख, अल्ताफ चोरडेकर, जानू कोकरे, हेमंत साळवी, अनंत चव्हाण, रमेश साळवी, सागर कोठारी, जयंता पांचाळ, अमित चव्हाण, सरफराज शिंदी, नवीन हिंदी, मन्सूर कडवेकर, रुमान पानसरे, गणेश जगताप, सुरेश कोतवाल, विनोद सावंत, भरत कोतवाल, तसेच जेष्ठ श्रेष्ठ महिला व युवक कार्यकर्ते या सभेत उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.