‘पनवेलमधून उत्तम कलाकार निर्माण होतील’” —
केशव उपाध्ये
पनवेल दि. २६ः
श्रीनिवास काजरेकर

पनवेल हे शहर थोडे एका बाजूला असल्याने मोठमोठ्या नाट्यसंस्था येथे येत नाही याबद्दल खंत व्यक्त न करता याकडे संधी म्हणून पहावे. स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून द्यावी. यामुळे पनवेलमधून दर्जेदार कलाकार निर्माण होतील असे विचार भाजप प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी, पनवेल शहर सांस्कृतिक सेल च्या वतीने आयोजित “मनोरंजन अनलॉक” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मानवाच्या तीन मुलभूत गरजांबरोबरच ‘व्यक्त होणे’ ही चौथी गरज असून कलेच्या माध्यमातून ती पूर्ण होते. आपल्या संस्कृतीमधे कलेला राजाश्रय आणि लोकाश्रयही लाभला त्यामुळे आजपर्यंत आपली कलासंस्कृती आजपर्यंत टिकून असल्याचे मत उपाध्ये यानी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष, सांस्कृतिक सेलच्या पनवेल शाखेच्या वतीने येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात “मनोरंजन अनलॉक” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊन संपल्यानंतर गायन, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिऴावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपा सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, राहूल वैद्य, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल मनपा सभागृह नेते परेश पाटील यांच्यासह मनपातील नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे रसिकांनी सभागृह हाऊसफुल्ल केले होते.
या निमित्ताने प्रसिद्ध संगितकार व गायक अनिरुद्ध भिडे यांच्या ‘सामगंध’ आणि गणेश भगत यांच्या पंचम निर्मित ‘गंध सुरांचा’ यांच्या संयुक्त विद्यमाने गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनिरुद्ध भिडे यानी गीतरामायणातील निवडक गाणी सादर करून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रणय पवार, संकेत गोविलकर, मयुरेश हिरे, भूपेंद्र पाटणकर, सिद्धेश शिंदे, श्रेयस केळकर, श्रावणी भिडे, स्वरदा भट, अपूर्वा भट, जुई महाजन, मानसी जगताप आदी कलाकारानी नांदी, नाट्यगीत, भावगीत व भक्तिगीतगायन केले. देवेन्द्र मराठे यानी संवादिनी, गणेश घाणेकर, आदित्य उपाध्ये यांनी ढोलकी, तबला, प्रविण भोपी यानी ऑक्टोपॅड, राजू भोईर यांनी कीबोर्ड साथ केली. अश्विनी भिडे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर सि. के. टी. महाविद्यालयाचे विद्यार्थी व कलादर्पण यांच्या वतीने “बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून” ही विनोदी एकांकिका सादर झाली.








Be First to Comment