Press "Enter" to skip to content

बारावी सायन्समध्ये संयुजाने मिळवले ८५.३८ टक्के !

सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )

नुकताच निकाल लागलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत को.ए.सो.एस्.पी.जैन ज्युनिअर कॉलेज नागोठणे येथील विद्यार्थीनी कु.संयुजा टिळक खाडे हिने विज्ञान शाखेत ८५.३८ टक्के गुण मिळवले आहेत . विशेष म्हणजे कोणताही खाजगी क्लास न लावता संयुजाने हे यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत देखील संयुजाने ९८ टक्के गुण मिळवून रायगड जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला होता . अभ्यासाबरोबरच संयुजाला वकृत्व , लेखन, चित्रकला , वाचन, विज्ञान आदी विषयांची लहानपणापासूनच आवड आहे. तिला नववीत असताना डाॅ .होमी भाभा बालवैज्ञानिक पुरस्कार मिळाला होता. तसेच तिने चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.दैनिक कृषीवलच्या अमृतमहोत्सवी वर्षात ती ‘ कृषीवल लिटिल चॅम्प ‘ ठरली होती.हस्ताक्षर स्पर्धेत व विज्ञान प्रदर्शनात देखील तिने खूप बक्षिसे मिळविली आहेत . चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ह्या दोन्ही परीक्षेत तिला ‘ ए ‘ ग्रेड मिळाली आहे . संयुजाला वैद्यकीय शाखेत जाऊन नामांकित शल्यविशारद होण्याची इच्छा आहे. संयुजाच्या ह्या यशामध्ये तिच्या महाविद्यालयातील शिक्षकांचा व तिच्या आईवडीलांचा मोलाचा वाटा आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत संयुजाने कोणताही खाजगी क्लास न लावता फक्त स्वयंअध्ययनावर भर देऊन हे यश मिळवले आहे. संयुजाच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागोठण्याचे सरपंच डाॅ.मिलिंद धात्रक , रोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.साधुराम बांगारे , स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नरेंद्र जैन यांनी अभिनंदन केले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.