कस्टम विभागाच्या जप्त केलेल्या कंटेनरमधून 4 कोटी 20 लाखाच्या सिगारेटची चोरी करणारी टोळी गजाआड
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून कालबाह्य व आरोग्यास हानीकारक असलेल्या 4 कोटी 19 लाख 90 हजार 400 रुपयाच्या गुडंग गरन सिगारेटस् स्टिक्स चोरी करणार्या टोळीला न्हावाशेवा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून 1 कोटी 81 लाख 88 हजार 720 रुपयाचा माल हस्तगत केला आहे.
न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीत स्पीडी सीएफएस , सोनारी गाव , उरण येथून कस्टम विभागाने जप्त केलेला व सुरक्षितते कामी स्पीडी सीएफएस येथे ठेवलेल्या सीलबंद कंटेनर मधून एकूण 4,1 9.9 0,400 रु किमतीचा गुडंग गरम ड्रडचे 23,32,800 सिगारेट्स स्टिक्स कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले बाबत कस्टम विभागाने तक्रार दिल्यावरून दिनांक 11/12/2020 रोजी गु.र.क्रमांक 18 9 / 2020 कलम 37 9 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता .
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा कस्टम विभागाच्या अखत्यारित असून तो अतिशय मोठ्या रकमेचा, त्याचप्रमाणे सदरचा माल कालबाहय व नाशवंत असल्याने तो मानवी आरोग्यास धोकादायक होता . त्यामुळे सदर माल लवकरात लवकर हस्तगत करणे अत्यंत आवश्यक असल्याने मा . पोलीस आयुक्त सौ , नवी मुंबई , मा . पोलीस सह आयुक्त , मा , अपर पोलीस आयुक्त , मा . पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 , मा.सहा पोलीस आयुक्त , पोर्ट विभाग यांनी सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणून नमूद गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते .
नमुद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने तपासी अधिकारी सपोनि / फुले व पथक यांनी माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाने गुन्हा दाखल झाल्यापासून अहोरात्र परिश्रम करून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांचे माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन अद्यापर्यंत एकुण 1,6 9 , 27 , 9 20 / – रुपये किंमतीच्या चोरी गेलेल्या एकुण 9 , 40,440 सिगारेट स्टीक्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यातील सर्व आरोपीत हे सध्या पोलीस कोठडीत असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास श्री . बिपीन कुमार सिंह , मा . पोलीस आयुक्त सो , नवी मुंबई , डॉ . श्री . डॉ . जय जाधव , मा . पोलीस सह आयुक्त , नवी मुंबई , श्री . डॉ . बी.जी. शेखर पाटील , मा . अपर पोलीस आयुक्त , नवी मुंबई , श्री.शिवराज पाटील , मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 पनवेल , श्री . सचिन सावंत , सहा . पोलीस आयुक्त , पोर्ट विभाग , श्री . प्रमोद जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . अशोक गायकवाड पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) न्हावाशेवा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक श्री निलेश फुले , न्हावाशेवा पोलीस ठाणे हे करीत असुन नमुद गुन्हयातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करून पाहिजे आरोपी अटक करीत आहोत . सदर कारवाईत वरील वपोनि / प्रमोद जाधव अशोक गायकवाड पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सपोनि / निलेश फुले सपोनि / पंडीत पाटील पोहवा / 1352 राजेंद्र बोराटे पोना / 64 महेंद्रसिंग राजपुत पोना / 2020 प्रमोद पाटील पोना / 1 99 7 विकास जाधव पोना / 2820 सांबरे पोना / 2815 धराडे पोना / 2330 प्रसाद वायगंणकर यांनी सहभाग घेतला.









Be First to Comment