सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील सांगवी येथे राहणाऱ्या श्रद्धा सुनिल नागोटकर यांनी कोरोना महामारीत शैक्षणिक क्षेत्रात काम केले, त्याबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्याचा विशेष गौरव केला.
श्रद्धा नागोटकर यांनी कोरोना महामारीत कर्जत येथील आदिवासी वाड्या वस्त्यांवर जाऊन तेथील आदिवासी व शिक्षणापासून वंचित मुलांना शैक्षणिक अध्यापन करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले.
पालकांकडे मोबाईल नसल्या कारणामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांना प्रत्यक्ष वाडी वस्तीत जाऊन शिक्षण दिले. तसेच मुलांना शालेपयोगी वस्तू ,मास्क तसेच सॅनिटाझर, खाद्यपदार्थांचे वाटप करून कोरोना आजाराविषयी जनजागृतीचे काम केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, भारती पालकर, डॉ. ज्योती मेंगाळ, नगरसेवक विवेक दांडेकर, धनंजय दुर्गे, कार्यकर्ते भानुदास पालकर उपस्थित होते.








Be First to Comment