Press "Enter" to skip to content

रोटरी क्लबच्या नागोठण्यातील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या नागोठणे शाखेच्या वतीने शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी नागोठणे ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८० पिशव्या रक्त जमा करण्यात आले. त्यामुळे या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरा दरम्यान पेण-सुधागडचे आमदार रविशेठ पाटील यांनीही उत्स्फूर्तपणे भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच आ. रविशेठ पाटील यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या.

या शिबिराचे उद्घाटन रोह्याचे पोलिस उपाधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी यांच्याद्वारे स्वतः रक्तदान करुन करण्यात आले. यावेळी नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे, डाॅ. जी.एस.कोकणे, डाॅ. सुनील पाटील, आनंद लाड, किशोर शिर्के, हितेश जैन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या निमित्ताने नागोठण्यातील प्रशांत गोरे यांनी ५० वे रक्तदान करण्याचे उल्लेखनीय कार्य केले.

त्याचबरोबर नागोठणे पोलिस ठाण्यातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनीही या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. जमा केलेले रक्त रोटरी क्लब आॅफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे डाॅ. बी.व्ही. लिमये रक्तपेढीला हे रक्त देण्यात येणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रमाणपत्र देण्यात आले.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी नागोठणे रोटरी क्लबचे सचिन मोदी, गौतम जैन, डॉ. अभिषेक शहासने, सुरेश जैन, ऍड. श्रीकांत रावकर, निलेश सोलंकी, डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. अझर दफेदार, धीरज मोदी, मांगीलाल चौधरी, प्रथमेश काळे,आदींसह अनेकांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.