सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्याशी संलग्न असलेल्या रोटरी इंटरनॅशनल क्लब ऑफ नागोठणेच्या अध्यक्षपदी सचिन मोदी यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी नागोठण्याजवळील चिकणी येथील हाॅटेल बाळारामच्या गार्डन मध्ये रात्री ८ वाजता संपन्न झालेल्या एका खास कार्यक्रमात सचिन मोदी यांनी आपल्या जबाबदारीची व पदाची सूत्रे रोटरी क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी डाॅ. अनिल परमार यांच्या हस्ते काॅलर परिधान करुन स्वीकारली.
याचबरोबर रोटरी इंटरनॅशनल क्लब ऑफ नागोठणेच्या सचिव पदाची जबाबदारी गौतम जैन यांना डिस्ट्रिक्ट मेंबरशीप डायरेक्टर मंजू फडके यांच्या हस्ते तर खजिनदार पदाची जबाबदारी निलेश सोलंकी यांना रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष अशिष शहा यांच्या हस्ते सोपविण्यात आली. यावेळी डाॅ. जी.एस.कोकणे, डाॅ. सुनील पाटील, डाॅ. अभिषेक शहासने, सुरेश जैन, अॅड. श्रिकांत रावकर, धिरज मोदी, प्रथमेश काळे, किशोर शिर्के, अप्पू कुट्टन, मांगीलाल चौधरी यांना नागोठणे रोटरी क्लबचे सदस्यत्वाचे प्रमाणपत्र व पीन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
रोटरी इंटरनॅशनल क्लब ऑफ नागोठणेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सचिन मोदी आपल्या मनोगतात म्हणाले की, नागोठण्यातील डाॅक्टर, वकील, इंजिनियर व इतर उच्चशिक्षित व्यक्ती यांना एकत्र करुन रोहा रोटरी क्लबच्या सहकार्याने सामाजिक कार्यासाठी नागोठण्यात रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे हद्दीत खुप अपघात झाले असुन त्यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे नागोठण्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून सुसज्ज हाॅस्पीटल उभारण्याचा मानसही यावेळी सचिन मोदी यांनी व्यक्त केला.
यावेळी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष मयूर दिवेकर, रोहा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विक्रम जैन, सचिव स्वप्निल धनावडे, खजिनदार दिनेश जैन, रोटरी क्लब माणगावचे अध्यक्ष विकी सप्रे, सतीष महाडिक, अमोल कुलकर्णी, भावेश जैन, संजय नाडकर, राजीव शहा, स्वप्निल परांजपे, भावेश जैन, सुरेंद्र निंबाळकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान रोटरी क्लबच्या शपथविधीच्याच दिवशी सचिन मोदी व त्यांच्या सहका-यांनी रक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक केले.








Be First to Comment