सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरणमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये दोन कोरोना रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.
कोविड आरोग्य केंद्र, सिडको ट्रेनिंग सेन्टर बोकडविरा येथे गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी श्रीमती कल्पना कमलाकर म्हात्रे वय वर्षे ६५ वर्षे व श्रीमती अंजुबाई गावडे वय वर्षे ५५ या दोन्ही रुग्णांना कोविड १९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह त्याच प्रमाणे त्यांची ऑक्सिजनची मात्रा कमी अधिक होत असल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

सदर रुग्णांवर उपचार विशेषतज्ञ डॉ. प्रफुल सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनोज भद्रे, डॉ. स्वाती म्हात्रे, डॉ. प्रियांका कोळी-म्हात्रे, डॉ. संयोगी भोईर, समन्वयक संतोष पवार आणि परिचारिका संगीता शिंदे, हिरा वीर, प्रणांजली थळी, स्नेहल घरत तसेच सर्व कर्मचारी नितेंद्र झेंडेकर, सौ. संपदा पाटील, सौ. पद्मिनी पार्डीकर, योगेश म्हात्रे, सौ. संजीवनी गायकवाड, नरेश गावंड यांनी प्रत्यक्ष उपचार व देखभाल करून योग्य ती काळजी घेतल्यामुळे दोन्ही महिला रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण बरे झाल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्त करत या रुग्णालयात जी आपुलकीची वागणूक मिळाली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. उरण येथे नुकतीच सुरू करण्यात आलेल्या डीसिएचसी बोकडविरा येथून पहिलेच दोन रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला. या रुग्णांना डाॅ. प्रफूल सामंत यांच्या हस्ते पुष्प देऊन डिस्चार्ज देण्यात आला.








Be First to Comment