Press "Enter" to skip to content

रसायनीत महिला मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी रिस येथील भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यालयानजीकच्या भैय्यासाहेब आंबेडकर भवनात महिला मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावर्षी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून महिला मुक्ती दिन रसायनीतील रिस येथे साजरा करण्यात आला.यानिमित्ताने भैय्यासाहेब आंबेडकर भवनात वंदना व सुत्रपठण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला मान्यवरांचे आगमन होताच. मान्यवरांच्या हस्ते रिस स्थानकावर असणा-या भारतीय बौद्ध महासभेच्या नामफलकाला राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तर सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या भवनातील प्रतिमांचे पूजन व दर्शन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

स्वागतगीत होवून बौध्दाचार्यांचे ओलखपत्र नुतनीकरण वाटपाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश गवई (राष्ट्रीय महासचिव भारतीय बौद्ध महासभा), भिकाजी कांबळे (राष्ट्रीय सचिव), रागिनीताईं पवार (केंद्रीय महिला उपप्रमुख), विजय कांबळे (कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य), सुशील वाघमारे (संस्कार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य)आदी उपस्थित होते.

यावेळी महिला मुक्ती दिनानिमित्त मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.यानंतर कोरोना काळात आॅनलाईन वर्षांवास मालिकेतील प्रवचनकारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.तसेच जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या शाखांनी कोरोना पाश्र्वभूमीवर केलेले कार्यांचा गौरव म्हणून त्यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच शालेय परिक्षांत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष संपदा चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश सोनावले, उषाताई कांबळे, विजय कांबळे,अनंत गायकवाड,, सरचिटणीस विजय गायकवाड, कोषाध्यक्ष सुभाष वाघमारे, सचिव सुनंदा वाघमारे,हासूराम कांबळे, गणेश कांबळे,रमाताईं गांगुर्डे ,त्रिशीला सावले,दिलीप भालेराव, कमलताई कांबळे, ग्रंथपाल टि.बि.त्रिभुवन आदींसह जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.