Press "Enter" to skip to content

पाले खुर्द येथील राष्ट्रवादी कार्यकत्याच्या मोटारसायकलची चोरी

◆ पोलीस दलाचे अपयश


सिटी बेल लाइव्ह /रोहा (शरद जाधव)


रोहा तालुक्याती पाले खु.येथील अजय विजय बाकाडे या राष्ट्रवादी कार्यकार्यकर्त्याची मोटार सायकल चोरीला गेली आहे.या घटनेला कित्येक दिवस उलटून सुध्दा चोरीचा तपास लागत नसल्याने कोलाड पोलीसदल अपयशी ठरत असल्याची खंत नागरिक व्यक्त करित आहेत
याबाबत सविस्तर व्रुत्त असे अजय बाकाडे यांनी आपल्या घराबाहेर MH 06 / AP 5956 नंबरची मोटार सायकल उभी केली होती.सकाळी उठल्या नंतर पाहिले गाडी गायब झाली होती. बाकाडे यांनी त्यावेळी त्वरीत पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र कित्येक दिवस उलटून सुध्दा चोरीचा तपास लागत नसल्यामुळे बाकाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.बाकाडे हे धाटाव येथे एका कंपनीत नोकरीस आहेत.गाडी चोरीला गेल्याने व इतर वहाने बंद असल्याने कंपनीत जाण्यास त्यांची कुचंबणा होत आहे.त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
कोलाड परिसरात भुरट्या चो-या वाढतच या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. परंतू तपास मात्र होत नाही.मागील २ वर्षापुर्वी कोलाडात एका घरातून दागिने व रोख रकम चोरीला गेली वास्तविक अशा चोरिचा तपास लागलाच पाहीजे अशी नागरीकांची अपेक्षा असते.परंतू तपास मंदावतो व तक्रार दाराच्या पदरी निराशा येते मग पोलीसांबाबत संशय निर्माण होऊन प्रकरण दाबले की काय ? तपास होणारच नाही अशी चर्चा होते.कोलाडामध्ये यापूर्वी अशा
कित्येक चोरीच्या घटनांचा तपास मार्गी लागला नाही. पोलीस कर्तव्यात कसुर करत असल्याने नागरिकांचा विश्वास उडत चालला असल्याचे दिसून येत आहे.
कोलाडात जवळपास ३० ते ३५ पोलिसांची कुमक असताना चोरीचा तपास लागत नाही यावरुन कोलाड पोलिसांचे हे अपयश असल्याची चर्चा नागरिक करित आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.