Press "Enter" to skip to content

संदेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोणवत येथे ओपन जीमचे अनावरण

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

चित्रपटातील एखाद्या हिरोसारखी आपलीही सिक्सपॅक शरीरयष्टी असावी, असे प्रत्येक तरुणाला नेहमीच वाटते. त्यासाठी व्यायाम शाळेत (जीम) जाऊन भरपूर व्यायाम करणे, तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. दुसरीकडे शारीरिक फिटनेससाठी मध्यमवयीन, वृद्ध व शालेय मुलेही छोट्या – मोठ्या व्यायामात रमतात.

मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाऊन त्याची व प्रशिक्षकांची फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता सर्वत्र हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात ‘ओपन जीम’ ला पसंती मिळू लागल्याने तरुणांची वाढती पसंती पाहता तांबाटी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून डोणवत स्टॉपवर महाराष्ट्र शासन क्रिडा खाते विशेष घटक योजने अंतर्गत ओपन जीमची निर्मिती करण्यात आली असून या जिमचे अनावरण तांबाटीचे माजी उपसरपंच संदेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य करण्यात आल्याने अनेकांना याचा लाभ होणार असल्यामुळे अनेकांनी ओपन जीम बाबत समाधान व्यक्त केले.

तांबाटी ग्राम पंचायतचे माजी सरपंच शरद कदम, विदयमान सरपंच अनिल जाधव माजी उप सरपंच संदेश पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन क्रिडा खाते विशेष घटक योजने अंतर्गत डोणवत फाटा येथे ओपन जिमला मंजुरी मिळाली अजून या ओपन जीमचे माजी उपसरपंच संदेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या जिम चे अनावरण करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी माजी सरपंच शरद कदम, विदयमान सरपंच अनिल जाधव शितल पाटील, स्नेहल गायकवाड, राजेंद्र पाटील, समित सावंत, माजी उपसरपंच संदेश पाटील, दिनेश पाटील, राकेश पाटील, जितू दळवी आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.