Press "Enter" to skip to content

चिंचवली येथे वाचनालयाचे उद्घाटन


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

चिंचवली येथील मारुती मंदिर सभागृहात रोशन संजय येरुणकर यांच्या संकल्पनेने मारुती रामा मालुसरे यांच्या शुभे हस्ते वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.

” एक चांगले पुस्तक हे एक हजार मित्रांच्या बरोबर असते,हे ड्रॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यां वाक्यरचने प्रमाणे चिंचवली गावातील शाळकरी मुले-मुलींना वाचन नव्हे, वाचनाचे व्यसन लागावे यामुळे लहान वयात लागलेली पुस्तक वाचण्याची आवड हि सुशिक्षित व सुसंस्कृत तरुण तरुणी घडविले जावे.व योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे हि कालाची गरज असून पुस्तका पासुन दुर गेलेली मुले व मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांना पुस्तकाचे व्यसन लागावे या उद्देशाने हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे.

या वाचनालयात ३ ते १०० वर्षा पर्यंत आजीवन निशुल्क सभासद असतील व हे वाचनालय २४ तास सुरु राहील व आठवडय़ातून दोन दिवस दोन तास विशेष वर्ग घेतले जातील असे सांगण्यात आले आहे. या उद्घाटनाच्या वेळी चंद्रकांत येरुणकर,वैभव विचारे,महेश येरुणकर,संजय महाडिक, सुरेंद्र येरुणकर,पुजारी शांताराम भोसले यांच्यासह असंख्य तरुण वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.