Press "Enter" to skip to content

वासंती वालावलकर यांचे निधन


पनवेल दि. २४ः

माजी शिक्षिका श्रीमती वासंती वालावलकर यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. स्वातंत्र्यसैनिक दिवंगत शांताराम वालावलकर यांच्या त्या पत्नी होत्या. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या श्रीमती वालावलकर यांनी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळा तसेच प्रॅक्टिसिंग स्कूलमधे त्यानी शिक्षिका म्हणून काम केले होते. आपल्या शिक्षणविषयक व्यासंग आणि प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका होत्या. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या सर्व विद्यार्थीवर्गाने तसेच पनवेल परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.