कोमना देवी ऑक्सिजन पार्क च्या नामफलकाचे अनावरण
सिटी बेल लाइव्ह । उरण ।
उरण तालुक्यातील सारडे गावातील सारडे विकास मंच या संस्थेने विकसीत केलेल्या ऑक्सिजन पार्क च्या नामफलकाचे अनावरण माजी आमदार मनोहर शेठ भोईर व साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोक जेथे दारूच्या पार्ट्या करत आणि रिकाम्या बॉटल्स तिथं टाकत असत तेथे सारडे विकास मंचने त्या बॉटल्स पासून जाण्याच्या रस्त्याला च्या बाजूला सुशोभिकरण केले. तसेच लोकांना बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था करण्यात आली.
त्याचप्रमाणे याठिकाणी तुळशी, निलगिरीची झाडे लावून ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे.









Be First to Comment