Press "Enter" to skip to content

सावरोलीमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन शाखा-खोपोली, सावरोली, मार्केवाडी, तीवरे, सेकटर खोपोली यांच्या वतीने रविवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत संत निरंकारी सत्संग भवन सावरोली खालापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबीर कोरोना संदर्भातील सरकारच्या सूचनांचे पालन करून केले जाणार आहे.

सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी आलिबाग-रायगड यांच्यामार्फत होणार आहे. संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला सन १९८७ पासून सुरू झाली असून दरवर्षी २४ एप्रिल मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, परंतु सम्पूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे व लॉक डाऊनमुले सम्पूर्ण देश भरात रक्ताचा तुडवडा जाणवत असून याच अनुषंगाने सावरोली येथे रायगड झोन ४० A झोनल इंचार्ज प्रकाध म्हात्रे यांच्या आदेशानुसार व खोपोली सेकटर प्रमुख कुलभादूर कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मंडळाचे शाखा सावरोली मुखी राजेश बैलमारे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.