Press "Enter" to skip to content

केगावमध्ये काँग्रेस,शेकापक्षाला खिंडार : कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश

सिटी बेल लाइव्ह । उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस आणि शेकापक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वासू ठेऊन भाजपा पक्षात जाहिररित्या गुरुवारी (दि२४) पक्ष प्रवेश केला आहे.

१५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातलेल्या केगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतच युवा पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत भाजपाची ताकद वाढली आहे.

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष अक्षय अशोक पाटील सह अतुल अशोक पाटील,दर्शन नारायण पाटील,प्रितेश पद्माकर पाटील,केतन रामचंद्र पाटील,प्रशांत नथुराम पाटील,हर्षद व्दारकानाथ पाटील या काँग्रेस आणि शेकाप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात जाहीररीत्या पक्ष प्रवेश केल्याने आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील पाटील,बांबू काटे,माजी नगरसेवक सुनील गावंड उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.