सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी ।
ठेकेदाराने रस्त्यावर अचानक गतिरोधक बसविले आहेत. याची माहिती वाहन चालकांना नसल्याने वेगाने आलेले वाहन आपटून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता नवपरिवर्तन संस्थेच्या पदाधिकार्यांनी सदर गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचे काम केले. यामुळे वाहन चालकांत समाधान व्यक्त केले जास्त आहे.
नवीन शेवा गावाजवळून खोपटे गावाकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर अचानकपणे ठेकेदाराने गतिरोधक बसविले आहेत. मात्र गतिरोधका ठिकाणी कोणतीही निशाणी नसल्याकारणाने वाहन चालक नेहमीच्या पध्दतीने वेगाने येऊन या ठिकाणी गाडी जोराने आदळत आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठेकेदाराने अचानकपणे रस्त्यावर गतिरोधक दोन दिवसांपूर्वी बसविले. मात्र याची पूर्वकल्पना किंवा कोणतेही चिन्ह नसल्याने वाहने भरधाव वेगाने येत असतात. त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी सामाजिक भावनेतून नवपरिवर्तन संस्थेचे विरेश मोडखरकर, संजीवन म्हात्रे, घनश्याम कडू, रमेश म्हात्रे व शेखर म्हात्रे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून रस्त्यावर पांढर्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम केले. यामुळे वाहन चालक सावधपणे वाहन चालवित आहेत. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज नसल्याचे वाहन चालकांत बोलले जात आहे.









Be First to Comment