सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विलास रघुनाथ जाधवर यांना नवी दिल्ली येथील ए के एस फाउंडेशन या संस्थेचा मानाचा आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० प्राप्त झाला आहे.त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
सदर संस्थेने या पुरस्कारासाठी जुलै महिन्यात नामांकनासाठी अर्ज मागवले होते. सदर पुरस्कारासाठी जगभरातून सुमारे एकशे दहा देशातून तीन हजार अर्ज आले होते यापैकी पाचशे जणांची निवड विविध प्रकारच्या कसोट्या मधून करण्यात आली होती त्यामध्ये प्राध्यापक डॉ. विलास जाधवर यांची निवड झाली आहे.
महाविद्यालय व परिसरामध्ये प्राध्यापक डॉ. विलास जाधवर हे नेहमीच आपल्या पर्यावरणातील पाण्याच्या प्रदूषणाचा समस्यावर विविध प्रकारचे संशोधन करत असतात.पाणी प्रदूषणावर त्यांनी आतापर्यंत १५ रिसर्च पेपर विविध प्रकारच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिका मध्ये प्रसिद्ध केले आहेत.तसेच महाविद्यालयांमध्ये रसायनशास्त्र विभागामार्फत पाणी प्रदूषण यावर आधारित एक महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स चालवत आहेत त्यामुळे विद्यार्थी व समाजामध्ये जनजागृती होत आहे. तसेच या कोर्समुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा मदत होत आहे तसेच त्यांनी २०१२ मध्ये श्रीलंकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये नागोठणे येथील पाणी प्रदूषण यावर संशोधन पत्राचे वाचन सुद्धा केले होते.त्यांच्या या सर्व प्रकारच्या सामाजिक व शैक्षणिक संशोधनाची दखल घेऊन सदर संस्थेने त्यांना ग्लोबल टीचर अवार्ड २०२० या पुरस्काराने गौरविले आहे.

त्यांच्या या कार्यामुळे त्यांना यापूर्वी विविध प्रकारे सन्मानित करण्यात आले होते.यामध्ये प्रामुख्याने २०१० साली कोकण रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार २०१२ मध्ये स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण युवा प्राध्यापक पुरस्कार २०१७-१८ पासून रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण समिती सदस्य २०१८-१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे औद्योगिक रसायनशास्त्र विषयासाठीचे बी. ओ. एस. सभासद म्हणून कार्यरत आहेत.तसेच यावर्षी देखील जून महिन्यांमध्ये इइटी .सी. आर. एस.एज्युकेशन एक्सपो टीव्ही, बंगलोर, या संस्थेने ९ व्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवार्ड २०२० चा सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह अजितभाई शाह, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खोपकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गावडे सर, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय नरेंद्रशेठ जैन, माननीय अनिलशेठ काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश गुरव, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.दिनेश भगत यांच्यासह सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment