Press "Enter" to skip to content

माथेरान विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे : वसंत शिंदे

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

माथेरान हे पूर्वीचे आणि आताचे यात खूपच तफावत दिसत असून इथे नवनवीन घडामोडी त्याचप्रमाणे आमूलाग्र बदल घडवून आणल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. धूळ विरहित रस्ते बनविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न ,पॉईंट्स वरील सुशोभीकरणासाठी तसेच पर्यटकांसाठी घेतली जाणारी सुरक्षा व्यवस्था खरोखरच वाखाणण्याजोगी असून यासाठी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या सदस्यांना सोबत घेऊन माथेरानला विकासाच्या नव्या उगमाकडे नेत असल्याचे पाहून खूप समाधान वाटत असल्याचे मत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ग्रीनिज बुकात ज्यांची नोंद झाली आहे असे ख्यातनाम माजी घोडेस्वार ( जॉकी )वसंत शिंदे यांनी व्यक्त केले.

शिंदे हे माथेरानचेच भूमिपुत्र असून प्रीती हॉटेलचे मालक आहेत. अनेक वर्षांपासून ते बंगलोरला वास्तव्यास असून दरवर्षी विश्रांती साठी आपल्या कुटुंबासह प्रीती हॉटेलमध्ये येत असतात.

आपल्या माथेरानमध्ये हळूहळू बदल घडून येत असून आगामी काळात हे पर्यटनस्थळ नावारूपाला येत असल्याने हा बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे प्रसाद सावंत यांच्या बद्दल अनेकदा ऐकले होते त्यामुळेच माथेरान भेटी दरम्यान वसंत शिंदेंनी प्रसाद सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन काही क्षण विस्तृतपणे चर्चा केली. यापुढेही आपल्या माध्यमातून या गावाच्या विकासाची धुरा अखंडपणे आपल्या खांद्यावर घेऊन माथेरानचे नाव सातासमुद्रापार नेण्यासाठी कटिबद्ध राहा असेही वसंत शिंदे यांनी जनसंपर्क कार्यालयातील भेटीदरम्यान सांगितले.

तर राजकीय क्षेत्रात अजूनही पाय भक्कम रोवले नसून जनतेची सेवा करण्यासाठी मी माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून आम्ही कामे करत आहोत. असे प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी वसंत शिंदे दांपत्याचा प्रसाद सावंत यांच्या कडून शाल, पुष्पहार देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, सूर्यकांत कारंडे, समीर पन्हाळकर, उमेश सावंत, अजमुद्दीन नालबंद, नरेश साबळे, बंटी साबळे, बाळू दाभेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.