सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील रहिवासी असलेले व सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पाली येथील शेठ ज. नौ. पालीवाला कॉमर्स, सायन्स व आर्ट्स महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. सुरेश विठ्ठलराव पाथरकर यांना नवी दिल्ली येथील ए. के. एस. फाउंडेशन या संस्थेचा मानाचा आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर्स पुरस्कार २०२० चा प्राप्त झाला आहे.
त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी दिनांक २० डिसेबंर २०२० रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सदर या संस्थेने या पुरस्कारासाठी जुलै महिन्यात नामांकनासाठी अर्ज मागवले होते. सदर पुरस्काराची जगभरातून सुमारे एकशे दहा देशातून तीन हजार अर्ज आले होते. यापैकी पाचशे जणांची निवड विविध प्रकारच्या कसोट्या मधून करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य असलेले प्राध्यापक डॉ. सुरेश पाथरकर यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयात गेली पंचवीस वर्ष इतिहास विषयाचे अध्यापन करत असतानाच त्यांनी डिसेंबर २०१२ ला त्यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींचे लोकजीवन व प्रगतीचा इतिहास (१९०१ ते १९८१) या कालखंडावर त्यांनी आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक व शैक्षणिक परिस्थिती या विषयांवर डोंगर-दऱ्या मधून फिरुन संशोधनाचे कार्य केले आहे.त्यामुळे त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने पी.एच.डी. पदवी प्रदान केली आहे.
आदिवासी समाजाचे संशोधन करत असताना त्यांनी आदिवासी समाजाच्या समस्या, व महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजासाठी केलेल्या सुधारणा व इतिहास विषयाच्या संशोधनासंबंधी १० रिसर्च पेपर विविध, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय conferece मध्ये प्रसिद्ध केले. तसेच डॉ. पाथरकर यांनी २००८ ते २०१३ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (गोपनीयतेचे) पाच वर्ष काम केले आहे. तसेच विविध महाविद्यालयात तज्ञ मार्गदर्शक व थोर पुरुषांच्या कार्यांवर रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी व्याख्याने दिली. व मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य म्हणून २०१७-१८ पासून कार्यरत आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक अधिकारी व पथक प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच इतिहास विषयाच्या पदव्यूत्तर वर्गांसाठी विद्यार्थ्यांना पतंगराव महाविद्यालय, पेण येथे वीस वर्षापासून अध्यापन करत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री वसंतराव ओसवाल साहेब, उपाध्यक्ष श्री रविंद्रजी लिमये, संस्थेचे सेक्रेटरी मा. रविकांत घोसाळकर, संचालक माननीय राजेंद्र पालवे सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली पुराणिक, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने (N.S.S.) चे संचालक प्रा. सुधीर पुराणिक, अर्थशास्त्र विषयाचे प्रमुख प्रा. गिते आर. एस. सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व परिसरातील नागरिक यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









Be First to Comment