सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
आखाडा व मल्लखांबाचा शिवकालीन असणारा खेळ हा आधुनिक काळात लोप पावत असतांना गोवे,शिलोशी,पुई येथील तरुणांनी जोपासला असल्याचे दिसून येत आहे.गोवे येथील लक्ष्मण जाधव यांचे चिरंजीव संजय व अशोक रटाटे यांची कन्या अंकित यांच्या विवाह पित्यार्थ मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके पाहून लोक अचंबित झाले.

गोवे व शिलोशी येथील जय हनुमान आखाडा हे दोन्ही मंडळ शिवकालीन मर्दानी खेळ वरात,शोभायात्रा,तसेच शिवजयंती व शुभ प्रसंगी सादर करत असतात.लाठीकाठी हि कळा फारच थोड्या गावातून पहावयास मिळते. शिवाजी महाराज यांच्या काळात शत्रुवर वार करण्यासाठी हि कळा अनेकांना अवगत होती.परंतुु ती पुढे थोडया तरुणांनी अवगत करून जतन केली आहे.असे शिलोशी मंडळाचे व्यवस्थापक श्री शरद गोळे यांनी सांगितले.

या खेळामध्ये गोवे येथील तरुण अमित घरट,भिमराज कापसे,हर्षद जाधव, रजत जाधव, विनय दहिंबेकर, प्रल्हाद कापसे, पुई येथील शुभंम वाफिलकर,रुषभ, सुभोद,तामेश,संदेश,यांनी चित्तथरारक मल्लखांबाची प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले तर शिलोशी येथील श्रीधर गोळे व प्रसाद गोळे यांनी अनेक शिवकालीन लाटी-काठी तलवारबाजी,दांडपट्टा,पेटत्या मशाली,यांच्या प्रात्यक्षिके सादर केल्या.तसेच कुमारी आरती दहिंबेकर व महिला भगिनी संगीता लोखंडे यांनी लाटी काठी खेळून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी शिलोशी येथील विलास गोळे पार्थ सपकाळ,मंगेश केदारी, निखिल किळंजे,दुर्गेश कनघरे, संदीप शेडगे,अतिश इन्द्रे, ऋषिकेश गोळे, वैभव गोळे, ह भ प रामचंद्र महाराज गोळे, गोवे ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








Be First to Comment