Press "Enter" to skip to content

लेखक विनय कुकडे यांचा सत्कार

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

“आम्ही दौंडकर “ग्रूपतर्फे नऱ्हे रोड , नवले पुलाजवळ असलेल्या सिध्दीविनायक अंगण सोसायटी मध्ये संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. दीपा सोनकर यांच्या निवासस्थानी कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग पाळून श्री. विनय कुकडे यांनी दौंड च्या आठवणी जागविणारे ,ओघवत्या शैलीतील लेख सर्वांना भावले याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अंबादास भोसले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दीपक गटणे होते.

वक्त्यांनी शुभेच्छा देताना लवकरच पुस्तक प्रकाशित व्हावे अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बाबू डिसोजा आणि अर्चना साने यांनी केले.या कार्यक्रमात सौ. शुभदा साठे, निलीमा शिकारखाने, उमा गटणे, माधुरी डिसोजा, रजनी दिवाणजी, मृणाल अनिखिंडी आदि उपस्थित होते.
सौ. अर्चना साने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.