Press "Enter" to skip to content

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य जिल्ह्यात पोहचविण्याचा प्रयत्न

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन लबडे तर जिल्हा मुख्य सचिवपदी पत्रकार राकेश खराडे यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । रायगड । विशेष प्रतिनिधी ।

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानाचे राज्यभर साहित्य , कला, क्रिडा ,सांस्कृतिक व इतर स्तरावर उल्लेखनीय कार्य असून हे प्रतिष्ठाण जनसामांन्याचे समस्या सोडविण्यासाठी कार्यं करत आहे.या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे प्रमुख मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया हे राज्यभर प्रतिष्ठानचे कार्य समाजापर्यत पोहचविण्याचे कार्यं करीत आहेत.शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्यांचा प्रसार व प्रचार रायगड जिल्ह्यातही व्हावा यासाठी रायगड जिल्ह्याची धुरा मोहन लबडे व पत्रकार राकेश खराडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

यासाठी मोहन लबडे यांची सामाजिक कार्यातील प्रगती तर पत्रकार राकेश खराडे यांची समाजाप्रती असलेली तळमळ ,पत्रकारीता क्षेत्रातील धारदार लेखणी व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा लेखक, दिग्दर्शक व चित्रपट निर्माते संदीप राक्षे यांच्याहस्ते रायगड जिल्हाअध्यक्षपदी मोहन बालकृष्ण लबडे तर रायगड जिल्हा मुख्य सचिवपदी पत्रकार राकेश काशिनाथ खराडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन लबडे तर जिल्हा मुख्य सचिवपदी पत्रकार राकेश खराडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.