आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ (सेल) च्या प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती
सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।
धनराज विसपुते यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्य व योगदान ध्यानात घेऊन , त्यांच्या कार्याच्या कक्षा अधिक व्यापक व्हाव्यात व त्यांच्या या कार्याचा समाज व राष्ट्राला अधिकाधिक फायदा व्हावा या हेतूने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना हे नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री व विद्यमान आमदार गिरीश महाजन, विद्यमान खासदार व माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी धनराज विसपुते यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर महाराष्ट्र प्रदेश शैक्षणिक संस्था प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आदर्श शिक्षण समुहाचे महाविद्यालयातील विश्वस्त प्राचार्य ,प्राध्यापक वर्ग, शिक्षकवर्ग, शिक्षककेतर अधिकारी कर्मचारी वर्ग,विद्यार्थी,समाज बांधव, आप्तेष्ट आदी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment