पीएनपी शैक्षणिक संस्थेत मृदुला म्हात्रे प्रथम
पीएनपी कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिकचा ९४. ३८ % निकाल
कला शाखेचा निकाल ८४. ६१
वाणिज्य शाखेचा निकाल ९७. २९
विज्ञान शाखेचा निकाल ९८. ५७
सिटी बेल लाइव्ह | अलिबाग | अमोल नाईक |
पीएनपी एज्युकेशन सोसायटी वेश्वी सन २०१९-२०२० मधील शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. पीएनपीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून पीएनपीची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असलेला बारावीचा टप्पा पार केला आहे.
कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयातील एकून निकाल ९४. ३८ % लागला.
यामध्ये विज्ञान शाखेत ८४. ४६ % गुण प्राप्त करून संस्थेत प्रथम येण्याचा मान मृदुला राजेश म्हात्रे हिने पटकाविला. ह्या विद्यार्थिनीचे वैशिष्ट्ये म्हणजे दहावीला सुद्धा ९६. ६० टक्के गुण मिळवून ती संस्थेत प्रथम आली होती तिने यशाची परंपरा कायम ठेवली. तिच्या मातोश्री रिना राजेश म्हात्रे या पीएनपी प्राथमिक शाळा वेश्वीच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
पीएनपी विद्यालयातील कला शाखेतील निकाल ८४. ६१ टक्के इतका लागला असून यामध्ये लिना उदय थळे ७२. ९२ टक्के मिळवून प्रथम तर वाणिज्य शाखेचा निकाल ९७. २९ टक्के लागला असून श्वेता रविंद्र होलकरी ७५. ०७ टक्के गुण मिळवून प्रथम.
सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, महाविदयालयाच्या प्रभारी प्राचार्या संजीवनी नाईक, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अमित देशपांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






Be First to Comment