Press "Enter" to skip to content

उपसरपंच निवडणुकीपूर्वीच्या वादाच्या पाश्वभूमीवर होता कडेकोट पोलीस बंदोबस्त

गणेश कानडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या संतोष जोरकर गटाच्या सारिका काळभोर यांची जांभूळ पाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड : सर्व स्थरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

स्वर्गीय मोहनराव पाटील यांच्या तालमीत घडलेले आम्ही कार्यकर्ते : भाई संतोष जोरकर

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे. अशातच सुधागड तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत आपापले वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व गट तट यांच्यात चुरस सुरू झालीय. सुधागड तालुक्यातील राजकीय व आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध व महत्वपूर्ण असलेल्या वऱ्हाड – जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारीका संदिप काळभोर या बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

उपसरपंच पदाची निवडणूक निवडणुक दि.(21)रोजी सरपंच श्रध्दाताई गणेश कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . उपसरपंच राजेश शिंगाडे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजिनामा दिल्यानंतर उपसरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली.

या निवडणुकीत माजी सरपंच गणेश कानडे यांचे कट्टर समर्थक असलेले भाई संतोष जोरकर यांच्या गटाच्या सारिका काळभोर यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. या निवडीने समर्थकांनी एकच जल्लोष केला. राजकीय दृष्टया सदर निवडणूक अत्यंत प्रतिष्टेची बनल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले होते.

यावेळी सारीका संदिप काळभोर यांचा निवडणूक प्रक्रियेसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पिठासिन अधिकारी तथा वऱ्हाड – जांभुळपाडा सरपंच श्रध्दाताई कानडे यांनी उपसरपंचपदी सारिका काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सारिका काळभोर यांनी वरिष्ठ नेतेमंडळी यांचे मार्गदर्शन व ग्रामपंचायतीचे सहकारी यांच्या साथीने गावाचा विकास व लोकोपयोगी कामे करण्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मागील झालेला वाद लक्षात घेता यावेळी काही अनुचित प्रकार घडून निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.

निवडणुकीची प्रक्रिया पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली होती. अशातच सदर निवडणुकप्रक्रिया शांततेत पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी संतोष जोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की , राजकारणात जय पराजय असतो, राजकारण हे नेहमीच थंड डोक्याने करायचे असते. उपसरपंच पदी माझ्या गटाच्या सारिका संदीप काळभोर या विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर लोकहिताची कामे होतील असा विश्वास जोरकर यांनी व्यक्त केला. स्वर्गीय भाई मोहनराव पाटील याच्या तालमीत घडलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे समाजभिमुख व दिशादर्शक राजकारण कसे करायचे, कारभार कसा असावा हे अचूक धडे आम्ही घेतले आहेत. राजकारण हे संयम व डोके शांत ठेऊन केले गेले पाहीजे . परंतु राजकारणाचा अनुभव नसलेले जे लोक वादविवाद निर्माण करून राजकारण करीत आहेत, त्यांना कुणीतरी समजविण्याची गरज असल्याचे जोरकर म्हणाले.

सरपंच श्रद्धा कानडे सर्वाना विश्वासात व सोबत घेऊन काम करीत आहेत. त्यांच्या कामकाजावर सारे खुश आहेत. ग्रामपंचायतीत होणाऱ्या विकासकामांवर सर्व सदस्य समाधानी असून ग्रामपंचायत हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम होत असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले . अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुक प्रसंगी माजी सरपंच गणेश कानडे , भाई संतोष जोरकर , उपसरपंच राजेश शिंगाडे , माजी सरपंच रविंद्र खंडागळे , माजी सरपंच मिलिंद बहाडकर , सामाजिक कार्यकर्ते आबा बहाडकर , काशिनाथ पवार , विशाल गुरव , संदेश लोंढे , सुधिर काळभोर , संदीप काळभोर , मंगेश जोरकर , नथुराम बेलोसे , मंगेश पालांडे , यशवंत ( भाई ) काळभोर , सचिन जोरकर , दीपक लोंढे , महेश गिरी , सुनिल वाघमारे , ताई वारे , नामदेव वारे , नाजुका विशाल गुरव , देवकी गजानन पवार , गजानन पवार , सारिका संदीप काळभोर , शिवराम पवार , नंदू कुडपणे , प्रमिला मंगेश कदम , राकेश साजेकर पांडुरंग फोंडे , सुधिर सावंत , मनोज शिंदे , शैलेश भोईर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते . नवनिर्वाचित उपसरपंच सारिका संदीप काळभोर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून विविध मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.