तटकरे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान आणि कला शाखेचा शंभर टक्के निकाल
सतीश पाटील यांच्या धोरणी नेतृत्वाने मार्गक्रमण करणाऱ्या संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.
कळंबोली येथील शामल मोहन पाटील इज्युकेशन सोसायटी च्या द ग तटकरे कनिष्ठ महाविद्यालयातील एचएससी च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादित केले आहे. या महाविद्यालयातील विज्ञान आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे. तर पूर्ण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे.एच एस सी परीक्षांच्या लागलेल्या निकालात नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल या शैक्षणिक संकुलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश मोहन पाटील यांच्या धोरणी नेतृत्वाने ही संस्था यशस्वी मार्गक्रमण करत आहे. एक शिक्षक पुत्र असणारे सतीश पाटील हे प्रामाणिक ज्ञानदान केल्याने सुदृढ राष्ट्र निर्मिती होते या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळेच कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना देखील केवळ विजिगीषू वृत्ती च्या जोरावर सतीश पाटील यांनी या शैक्षणिक संकुलाचा डोलारा स्वबळावर निर्माण केला आहे. त्यांच्या संघर्षातून साकार झालेल्या वृक्षाला जेव्हा गोमटी फळे येऊ लागतात तेव्हा निश्चितच ऊर अभिमानाने भरून येतो.
द ग तटकरे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील 70 पैकी 70 तर कला शाखेतील 16 पैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर वाणिज्य शाखेतील 67 विद्यार्थ्यांपैकी 66 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याबाबत प्रतिक्रिया देताना सतीश पाटील म्हणाले की हे यश सगळ्यांचे आहे मी केवळ निमित्तमात्र. प्राध्यापक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक या साऱ्यांचे हे सांघिक यश आहे. अध्ययनाच्या कार्यात विद्यार्थ्यांना काही कमी पडू नये, आणि अध्यापनाच्या कार्यात शिक्षकांना काही कमी पडू नये हे पाहण्याचे काम मी नित्यनेमाने करत असतो.








Be First to Comment