सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स येथे काम करणार्या नोकरानेच जवळपास साडेचार लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील एम.सी.सी.एच सोसायटी या ठिकाणी पु.ना.गाडगीळ यांचे ज्वेलर्स असून या ज्वेलर्समध्ये काम करणारा अभिषेक चंद्रकांत मालणकर याने या दुकानातून वेगवेगळ्या आकाराची दोन सोन्याची बिस्किटे ज्याची किंमत जवळपास साडेचार लाख रुपये इतकी आहे ही चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment