लाॅकडाऊन मुळे आदिवासींवर बारा दिवस त्यांच्यावर उपासमारीची वेळ
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
डोंगराळ भागातील ओसाड भागात उगावणाऱ्या पालेभाज्या या आदिवासी समाजाचे उदरनिर्वाहचे साधन बनले आहे.या रानभाज्या आदिवासी समाज बाजारपेठेच्या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन येत असुन या रानभाज्या आदिवासी समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवताना दिसत आहे.परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ जुलै २०२० ते २६जुलै पर्यंत संपूर्ण रायगड जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला असल्याने आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना वाढता प्रादुर्भावा लक्षात घेता संपूर्ण रायगड जिल्हा हा १५ जुलै २०२० च्या मध्यरात्री पासून ते २६ जुलै २०२० पर्यंत बंद करण्यात येण्याचे संकेत मिळताच भाजी दुकानात प्रचंड गर्दी होताच भाजीचे दर ही गगनाला भिडलेले दिसत होते. त्यामध्ये आदिवाशी समाजाच्या रानभाज्या लॉकडाऊनमुळे बंद होणार असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागले.
पावसाळ्यात आदिवासी समाजाला मोलमजुरीसाठी कामे फार कमी प्रमाणात असतात.त्यामुळे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खास ग्रामिण भागातील डोंगराळ भागातील निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आदिवासी समाज जाऊन या खजिन्यातुन टाकला,तेरी,कुडा,आलू, अळंबी,अशा कितीतरी प्रकारच्या भाज्या घेऊन बाजारात विकण्यासाठी येतात.पावसाळ्यातील पालेभाज्या एक प्रकारची मेजवानीच ठरत आहे.यामुळे या भज्यांची विक्री ही मोठया प्रमाणात होतांना दिसते.अशा निसर्गनिर्मित रानभाज्या प्रत्येक बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या जात आहेत.परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन करणे गरजेचे असले तरी रानभाज्या अणून बाजारात विकून आपला उदर्निवाह करणाऱ्या आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.






Be First to Comment