Press "Enter" to skip to content

जय भवानी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे चेअरमन सरफळे रावसाहेब हस्ते प्रकाशन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।

रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वरसे, भुवनेश्वर या पतसंस्थेची मासिक सभा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी बी सरफळे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन संपन्न झाली.

पतसंस्थेच्या स्वीकृत संचालक पत्रकार महेश बामुगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जय भवानी पतसंस्थेच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी बी सरफळे यांच्या शुभहस्ते व उपाध्यक्ष शंकरराव भगत, संचालक सचिव उदय मोरे, कोषाध्यक्ष ऍड. सुनिल सानप, संचालक मनोहर मेहतर, सुहास खरिवले, दिपक जाधव, विनायक पवार, किशोर सकपाळ महेश बामुगडे, व्यवस्थापिका बंधीनी धनावडे, लिपिक निता शिंगृत यांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा पार पडला.

महेश बामुगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सभेला अध्यक्ष सरफळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर सचिव उदय मोरे यांनी इतिवृत्त वाचन करून शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करून सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.